loader image
[ays_poll id=7]

लोकसंख्या दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात ऑनलाईन व्याख्यान संपन्न

Jul 14, 2022



महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागांतर्गत लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या एक साधन संपत्ती या विषयावरती ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. या ऑनलाईन व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून भोसला मिलिटरी महाविद्यालय नाशिक येथील प्रा. डॉ. विलास उगले यांनी पीपीटी द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच लोकसंख्या एक साधन संपत्ती, त्याचे गुण वैशिष्ट्ये याविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलनेे 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.या प्रसंगी *महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील * यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून निमगाव महाविद्यालय येथील आदरणीय *प्राचार्य डॉ. एस. एन. निकम * व एम. एस. जी. महाविद्यालय येथील *उप-प्राचार्य प्रा. डॉ. सी.एम. निकम * उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा.डॉ. प्रमोद आंबेकर सर उपस्थित होते. या *कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा. एस. आर. पगार * यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. डी. व्ही. सोनवणे सर यांनी करून दिली. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. गणेश गांगुर्डे यांनी केले. या कार्यक्रमासाठी भूगोल विभागातील प्रा.प्रकाश बर्डे यांचे सहकार्य लाभले व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.