loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात डॉ स्मिताताई प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिमोग्लोबिन व थायरॉईड तपासणी शिबिर संपन्न

Jul 14, 2022



मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक 14 जुलै 2022 रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीच्या कोषाध्यक्ष डॉ.स्मिताताई प्रशांत हिरे यांचा वाढदिवस महाविद्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी प्रथमतः महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे व लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. त्यांनी आपल्या मनोगतातून हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे महत्त्व व गरज विशद केली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ मोहन वारके यांनी आपल्या आरोग्यासाठी हिमोग्लोबिनचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या शिबिरात नांदगाव तालुका वैद्यकीय विभागातर्फे विद्यार्थिनींसाठी फॉलिक अॅसिडच्या गोळ्या देण्यात आल्या. या शिबिरात विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन व थायरॉईड चाचणी घेण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ पी.बी परदेशी, प्रास्ताविक डॉ जे डी वसईत तर आभार प्रदर्शन महिला विकास समिती अध्यक्ष प्रा कविता काखंडकी यांनी केले. या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष जगताप, डॉ. बाबुराव गोरे, आशासेविका सौ मोहिनी मैद, हिंद लॅबचे लॅब कॉर्डिनेटर शुभम परदेशी, सिमॉन स्वामी, यामिनी लोहार, अंजली परदेशी व अविनाश गवारे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे, पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर शिबिराचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना, महिला विकास समिती, व जनसंपर्क विभाग यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.