महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालय व केंद्र शासन पुरस्कृत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सुरू आहेत. शालांत परीक्षा(इ. १०वी )उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता ११वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येतो इयत्ता ११वी आणि १२वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा आहे. हा अभ्यासक्रम मराठी माध्यमातून असल्यामुळे समजण्यास सोपे व पाठ्यपुस्तके उपलब्ध आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शासनाने उच्च शिक्षणाच्या व रोजगाराच्या वेगवेगळ्या वाटा दाखविल्या आहेत. १) इयत्ता १२वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी पास झाल्यानंतर महाविद्यालयात एफ वाय बी ए /एफ वाय बी कॉम) एफ वाय बी एससी./ ए एफ वाय बी बी ए साठी प्रवेश मिळतो २) तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) डिप्लोमा च्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो व डिप्लोमा करणे सोपे होते ३)बारावी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी पास झाल्यानंतर ज्यांना नोकरी करायची असेल त्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम.आय.डी.सी मध्ये सुपरवायझर/ टेक्निशियन /ट्रेनर या पदावर तसेच सरकारी/ निमसरकारी क्षेत्रात नोकरी मिळते. तसेच एक वर्षाच्या प्रशिक्षणाची (अप्रेंटिस)सोय केली आहे. ४) मुलींना टेक्निशियन ऑपरेटर म्हणून सरकारी /निमसरकारी किंवा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत नोकरी मिळते. ५) १२वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक व सोप्या अभ्यासक्रमामुळे बारावी पास होणे अधिक सोपे व चांगले मेरिट मिळते.६) ११वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम मनमाड शहरात कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सुरू आहे. अधिक माहितीसाठी उपप्राचार्य पी. के. बच्छाव (9423699465) व प्रा. एस. एस. सोनवणे (9423790985)या क्रमांकावर संपर्क साधावा.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











