मनमाड – मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या ५० वर्षा पेक्षा जास्त कालावधी पासून मनमाड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना विविध विषयात लेखन, करण्याची गोडी लागावी म्हणून मनमाड शहरात या आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.गत दोन वर्षात ही परंपरा वाचनालया ने कायम राखून या स्पर्धा ऑनलाइन संपन्न झाल्या आणि आता यंदाही हिच परंपरा टिकवत वाचनालयातर्फे रविवार दि.२४ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजता छत्रे हायस्कुल येथे आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे तर सोमवार दि.१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ वाजता इंडियन हायस्कुल लोकमान्य सभागृह येथे कथाकथन स्पर्धा तर दुपारी २ वाजता आंतरशालेय वक्तृत्व नियोजीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे विषय व नियमावली चे माहितीपत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आली असून स्पर्धे च्या सहभाग साठीची नावे शाळेमार्फत विद्यार्थ्यांनी नोंदवावी निबंध स्पर्धे साठी नोंदणी ची मुदत रविवार दिनांक २४ जुलै २०२२ ला सकाळी १० वाजेपर्यंत आहे तर कथाकथन व वक्तृत्व स्पर्धे साठी शनिवार दिनांक ३० जुलै २०२२ ला सायंकाळी ५ वाजे पर्यंत नोंदणी ची मुदत आहे या आंतरशालेय स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना व्यक्तिगत पारितोषिक रोख व पुस्तक /प्रमाणपत्र स्वरूपात देण्यात येईल तसेच या सर्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विध्यार्थ्यांना सहभाग प्रमाण पत्र देण्यात येईल या स्पर्धेत परीक्षकांचा निकाल अंतिम राहील आणि तो सर्व स्पर्धकांन वर बंधनकारक राहील वक्तृत्व स्पर्धा झाल्या नंतर त्याच ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात येईल तरी मोठ्या संख्येने या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष प्रदीप गुजराथी, सुरेश शिंदे, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट, संचालक नरेश गुजराथी, आदीं सह संचालक मंडळाने केले आहे
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











