loader image
[ays_poll id=7]

कपिलवस्तू बुध्द विहारात वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ

Jul 15, 2022


जागतिक बौद्ध दिनाचे औचित्य साधून बुद्धवाडीतील कपिलवस्तू बुद्ध विहारात महामहा महिला मंडळाच्यावतीने वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असा तीन महिने चालणाऱ्या वर्षावास कार्यक्रमात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन करण्यात येणार आहे.केंद्रीय शिक्षक भागतराव गांगुर्डे व बौद्धाचार्य मच्छिन्द्रनाथ भोसले यांनी बुद्ध वंदना घेऊन ग्रंथ वाचनाला सुरवात केली.
माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांची शिवसेना ग्रामिण जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल तसेच पत्रकार निलेश वाघ यांना कर्मयोगी पुरस्कार मिळल्याबद्दल सत्कार करण्यात आला.तर अमोल गांगुर्डे यांच्यावतीने वर्षावसामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.बुद्ध विहार विकास समितीचे अध्यक्ष अरुण अंकुश, खजिनदार मिलींद गांगुर्डे,सचिव अशोक गरूड,साहेबराव आहिरे तसेच वर्षावास समितीच्या अध्यक्षा शालुबाई भोसले, उपाध्यक्षा उषाताई केदारे,सचिव वंदना अंकुश, खजिनदार ताईबाई केदारे, उपसचिव तताबाई पगारे, सल्लागार कलाबाई एळींजे, चंद्रकलबाई दि. एळींजे, चित्राबाई अंकुश, संजीवनी गरूड, सुमन कसबे, सुमन गरूड, अलकाबाई केदारे, लक्ष्मीबाई वाघ, भारती केदारे, संगीता जाधव, मंदाबाई जाधव, अंजनाबाई अंकुश, अंजनाबाई हिरे, लताबाई हिरे,कमळाबाई एलिजे,कामिनीबाई केदारे ,कमलाबाई हिरे, भागुबाई जगताप,निर्मलाबाई अंकुश व अनिता केदारे,आम्रपाली वाघ आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.