loader image
[ays_poll id=7]

भाजपा मनमाड नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष व 33 जागा स्वबळावर लढविणार ; केदानाना आहेर

Jul 15, 2022


आगामी काळात मनमाड नगरपालिका च्या पंचवार्षिक निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने मनमाड शहर भाजपाची महत्वपूर्ण बैठक पल्लवी मंगल कार्यालयात संपन्न झाली या बैठकीच्या व्यासपीठावर भाजपा चे उत्तर महाराष्ट्र चे विभागीय संघटन मंत्री आदरणीय रवी अनासपुरे ,भाजपचे नासिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर,भाजपा नासिक जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा सुनील बच्छाव ,भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी , भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, राजेंद्र पवार,भाऊराव निकम,भाजपा माथाडी कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष नारायण पवार,भाजपा शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी आपले प्रास्तविका मध्ये मनमाड नगरपालिका निवडणूक संदर्भात सविस्तर माहिती सादर केली भाजपा सरचिटणीस सुनील बच्छाव व भूषण कासलीवाल यांनी बूथ रचना संबंधित आढावा घेतला तर संघटन महामंत्री रवीजी अनासपुरे यांनी आगामी नगरपालिका निवडणूक संदर्भात इच्छुक उमेदवारानी जनसंपर्क अभियान तळागाळा पर्यंत राबविण्याच्या सूचना केल्या तर भाजपा च्या पदाधिकारी व कार्यकर्ते नी सर्व शक्तीनिशी मनमाड शहरात 16 प्रभागातील 33 वार्ड व थेट नगराध्यक्ष ची निवडणूक भाजपा च्या कमळ चिन्हावर स्वबळावर लढवावी भाजपचे जिल्हा नेतृत्व आपले पाठिशी खंबीर पणे उभे राहिल असे भाजपा जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर यांनी आपले आक्रमक भाषणात सांगितले पंकज खताळ, सचिन दराडे,जयकुमार फुलवाणी यांनी या बैठकीत महत्वपूर्ण सूचना केल्या या बैठकीत महाराष्ट्र राज्यात नव्याने झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपा चे नेते व उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन सरकार च्या अभिनंदन चा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला ह्या बैठकीत भाजपा नासिक जिल्हा आर्थिक सेल सेल चे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत,भाजपा नासिक व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी ,व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत जेष्ठ नेते नीलकंठ त्रिभुवन भाजपा शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे, नितीन अहिरराव ,भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शहर अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा महिला मोर्चा मनमाड शहर अध्यक्ष सौ सोनीताई पवार,भाजपा शहर कोशाध्यक्ष आनंद काकडे, भाजपा व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष अमित गोगड भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे, सुनील पगारे, बुधन बाबा शेख,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र गायकवाड,भाजपा भटके विमुक्त जिल्हा सरचिटणीस अकबर शहा, भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुऱ्हाण शेख, अनुसूचित मोर्चा शहर अध्यक्ष आशिष चावरिया ,भाजप दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष दिपक पगारे, भाजप डॉक्टर चे अध्यक्ष डॉ सागर कोल्हे भाजपा शहर चिटणीस नारायण जगताप, मकरंद कुलकर्णी, धीरज भाबड,सुमेर मिसर, दीपक गोयल,राजाभाऊ भाबड,ट्रास्पोर्ट आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील, अमित सोनवणे, मुतुझा रस्सीवाला,सौ सुचेता खताळ,अक्षता दीपक पगारे,अमोल तावडे मयूर माळी,ज्ञानेश्वर केकाण,सचीन हिरालाल लुणावत,दीपक सोनवणे,सूरज कल्याणी, तौसिफ तांबोळी, या पदाधिकाऱ्यांन सह भाजपा कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी केले तर नितिन परदेशी व आनंद काकडे यांनी बैठकीचे सूत्र संचालन केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.