loader image
[ays_poll id=7]

केंद्र शासनाच्या अमृत २ /० योजनेत नांदगाव व मनमाड शहराचा समावेश आ.सुहास कांदे यांच्या प्रयत्नांना यश

Jul 15, 2022


नांदगाव : याबाबत वृत असे की केद्रं शासनाच्या अमृत २/० या योजनेत नांदगाव व मनमाड शहराचा समावेश करण्यात आला असल्याची माहीती आ. सुहास कांदे यांनी दिली . केंद्र शासनाची अमृत २/० या योजनेत नांदगाव व मनमाड नगर परिषदांचा समावेश करण्यात आला आहे. १४ जुलै रोजी पार पडलेल्या मंत्री मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजने अंतर्गत विविध लोकोउपयोगी सुविधांचे विकास कामे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारची सन २०१५ पासून अमृत १/० ही योजना राबवण्यात येत आहे परंतु ती केवळ राज्यातील ४४ शहरांपूर्ती मर्यादित होती.राज्य शासनाने दिनांक १४जुलै २०२२ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या नागरी भागात मूलभूत सुविधांचा अभाव दूर करण्यासाठी केंद्र पुरस्कृत अमृत २/० ही योजना राबवण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या मध्ये राज्यातील सर्वच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून सन २०२१ /२२ ते २०२५/२६ या कालावधीत या योजने अंतर्गत १) शहरातील प्रत्येक घराला नळ जोडणी देऊन पाणी पुरवठ्याच्या बाबतीत १०० % स्वयंपूर्ण करणे. २) मोकळ्या जागेमध्ये उद्याने व हरित क्षेत्र निर्माण करणे तसेच ३) भूमिगत गटार करणे ही योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
अमृत २/० योजनेत एकूण प्रकल्पाच्या ब वर्ग नगर परिषदांसाठी ५० टक्के केंद्रसरकार ४० टक्के राज्यसरकार व १० टक्के स्थानीक स्वराज्य संस्था तसेच क वर्ग नगर परीषदांसाठी ५० टक्के केंद्रसरकार ४५ टक्के राज्यसरकार व 5 टक्के स्थानीक स्वराज्य संस्था या प्रमाणे आर्थिक हिस्स्याचे प्रमाण असणार आहे.
अमृत २/०योजने अंतर्गत नांदगाव व मनमाड शहरातील नागरी सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहेत, या योजने अंतर्गत १०० % नळ जोडणी, विविध ठिकाणी उद्याने तसेच भूमिगत गटारींची काम केली जाणार असून यामुळे शहराचा विकास होऊन नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे .मंत्री मंडळाच्या निर्णयाचे नांदगाव शहरवासियांनी स्वागत केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.