अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून 5% जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेतल्याचे समजते आहे. सदरबाबतचे नोटीफिकेशन दि. 13 जुलै 2022 रोजी काढलेला आहे. केंद्र सरकारने अन्नधान्य, खाद्यान्न व जीवनावश्यक वस्तूंवर 5% जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी, छोटे व्यापारी आणि पर्यायाने सामान्य जनतेला बसणार आहे. त्यामुळे महागाई अजूनच वाढून सर्वसामान्य जनता यात भरडली जाणार आहे.
जी.एस.टी. मध्ये अन्नधान्य, गुळ, कडधान्य या वस्तूंचा समावेश केला आहे. सदर जीएसटी दि. 18 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. याबाबत चेंबर ऑफ कॉमर्स ने देशव्यापी बंद शनिवार दि. 16 जुलै 2022 रोजी पुकारण्यात आला होता । त्यामध्ये मनमाड येथिल किराणा व्यापारी असोसिएशन, अन्न धान्य व्यापारी हे सहभागी झाले ।
या निर्णयाचा मनमाड किराणा असोसिएशन वतीने जाहीर निषेध करण्यात आले .
केंद्र सरकारने हा अन्यायकारक व मॉल संस्कृती च्या हितासाठी घेतलेला निर्णय त्वरीत कायस्वरूपी रद्द करावा ही मागणी केली. मोर्च्यात किराणा असोसिएशन चे अध्यक्ष दिपकभाऊ मुनोत ,उपाध्यक्ष किरण देव ,सचिव अनुप बेदमुथा ,सहखजिनदार संतोष नहार ,मार्गदर्शक कैलास बेदमुथा ,अनिल लोढा ,दिनेश बेदमुथा ,अमोल मुथा ,पंकज पाटणी ,भरत छाबडा, महेश नावरकर , विनोद सांगळे ,दिलीप लुनावत , रामुभाऊ जैन ,भूषण लुनावत, अभय नाईक ,राजू रुपारेल , शैलेश ब
बाकलीवाल ,अभय हिरण ,पारस आचलिया , कांतीलाल मेंगाने ,सोमनाथ मेंगाने ,पंकज लोढा ,जगु लुनावत ,संतोष जगदाळे ,सोनू लुनावत , मनोज लुनावत ,ओमसिंग राठोड आदी सर्व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











