loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या गावठाण परिसरातील रस्त्यांची कामे करावी : राष्ट्रवादीची मागणी

Jul 18, 2022


मनमाड शहरातील गावठाण अंतर्गत येणारे रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची मागणी मनमाड शहर  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मुख्याधिकारी राजेश पटेल यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
सध्या पावसाळा असल्याने गावठाण मधील बरेच रस्ते खूप खराब झाले असून भगवान महावीर भवन ते पाकिजा कॉर्नर या मुख्य रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झालेली असून पावसामुळे या रस्त्यात खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून जागोजागी खड्ड्यात पाणी साचत असून नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. हा शहरातील मुख्य रस्ता असून सर्व मिरवणुका, अंत्ययात्रा, शालेय विद्यार्थ्यांची तसेच आठवडे बाजारासाठी याच रस्त्याचा मुख्यत्वे वापर होत असतो, त्यामुळे तो त्वरित दुरुस्त करण्यात यावा, असे निवेदनात नमूद केलेले आहे.
निवेदनावर शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, महिला शहराध्यक्ष अपर्णा देशमुख, अमोल गांगुर्डे, नितीन वाघमारे, अक्षय देशमुख, राजू करकाळे, बाबा पठाण, प्रसन्ना पाटील, श्रीराज कातकाडे, आनंद बोथरा आदींच्या सह्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.