मनमाड शहरातील एफ.सी.आय.रोड व डी.वाय.एस.पी.कार्यालय ते गणपती मंदिर परिसरातील रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची मागणी मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मुख्याधिकारी राजेश पटेल यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली. सध्या पावसाळा असल्याने या परीसरातील मुख्य रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झालेली असून पावसामुळे या रस्त्यात खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून जागोजागी खड्ड्यात पाणी साचत असून सदर परिसरातील शाळा, एफ.सी.आय. मध्ये येणाऱ्या नोकरदार वर्ग तसेच नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. शालेय विद्यार्थी, एफ.सी.आय. मधील मोठी वाहतूक व नागरिकांचे हित लक्षात घेता सदर रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, असे निवेदनात नमूद केलेले आहे. निवेदनावर शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, महिला शहराध्यक्ष अपर्णा देशमुख, अमोल गांगुर्डे, नितीन वाघमारे, अक्षय देशमुख, राजू करकाळे, बाबा पठाण, प्रसन्ना पाटील, श्रीराज कातकाडे, आनंद बोथरा आदींच्या सह्या आहेत.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











