loader image
[ays_poll id=7]

यंदाचा कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार सुकुमार देसले यांना जाहीर

Jul 19, 2022


ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, स्वातंत्र्यसेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा यंदाचा कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार श्रमिकांच्या चळवळीसाठी आयुष्य वेचणारे आयटक राष्ट्रीय नेते कॉम्रेड सुकुमार दामले यांना जाहीर करण्यात आला असून बाबूजींच्या स्मृतिदिनी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

संयुक्त महाराष्ट्र लढा, खंडकरी शेतकरी, सहकार, नगर पालिका, रेल्वे आशा विविध चळवळीत ७५ वर्ष योगदान देणाऱ्या कॉम्रेड माधवराव गायकवाड (बाबूजी) यांचा विचाराचा वारसा व कार्य नेण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेतर्फे दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक शेती, सहकार चळवळ, कामगार आशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो या अगोदर या पुरस्काराने शेतकरी नेते राजू शेट्टी, एम ए पाटील, मोहन शर्मा, यांना गौरविण्यात आले आहे. यंदा पुरस्काराचे चौथे वर्ष असून या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना ( आयटक) चे अध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळणारे श्रमिकांच्या चळवळीसाठी आयुष्य वेचणारे राष्ट्रीय नेते कॉम्रेड सुकुमार दामले (दिल्ली) यांना जाहीर करण्यात आल्याचे स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था च्या अध्यक्षा ॲड. साधना गायकवाड, सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी जाहीर केले यावेळी
विश्वस्त भास्कर शिंदे, कुसुमताई गायकवाड, रिकब जैन, सुभाष बेदमुथा, छबूशेठ शिरसाठ, मिखील स्वर्गे, व्ही डी धनवटे, दत्तू तुपे आदी उपस्थित होते.
रोख रक्कम ३१ हजार, स्मृती चिन्ह , सन्मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून १२ नोव्हेंबर रोजी कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.