loader image
[ays_poll id=7]

नागापूर मध्ये घाणीचे साम्राज्य : गावकर्यांचे आरोग्य धोक्यात

Jul 19, 2022


स्वच्छ व सुंदर गावाचा पुरस्कार पटकावणाऱ्या नागापूर ता.नांदगांवआज घाणीच्या साम्राज्याने वेढले असून गावालगतचे रस्ते,शालेय परिसर, गाव अंतर्गत गटारी आदी सर्वत्र ठिकाणी अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाल्याने गावाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.तर ऍक्वा गार्डच्या पाण्याचे प्लांट बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल होत असल्याची तक्रार उपसरपंच सुधाकरबाबा पवार,सदस्य अशोक पवार यांनी केली आहे.
या परिसरात असलेल्या सर्वच इंधन प्रकल्पामुळे श्रीमंत म्हणून नागापूर ग्रामपंचायत ओळखली जाते.तर ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ व सुंदर गाव म्हणून तत्कालीन राष्ट्रपदी अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार ही मिळाला आहे.मात्र काही दिवसापासून ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या दुर्लक्षामुळे गावात सर्वत्र घाणीचा उकिरडा झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.तर ग्रामपंचायतीने सुरू केलेले पाच रुपयात वीस लिटर एक्वाचे शुद्ध पाणी ही बंद झाले असल्याने ग्रामस्थांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून ग्रामसेवक तर मनमानी पद्धतीने वागत असल्याचे ही उपसरपंच सुधाकरबाबा पवार,अशोक पवार यांनी म्हटले आहे.दरम्यान गावभर घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली.गटारीचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने गटारी तुंबल्या आहेत.गटारी क्रॉसिंगचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून,शाळेची संरक्षण भिंत पडल्याने आवारात कुत्रे,डुकरांचा सर्रास वावर सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती व्यक्त होत आहे.गटारी,रस्ते परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.दरम्यान गेल्या अनेक महिन्यापासून गावाच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामसेवक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.अकार्यक्षम प्रशासनाविरोधात ग्रामस्थांच्या भावना तीव्र बनल्या आहेत.वेळीच ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपसरपंच सुधाकरबाबा पवार यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.