loader image
[ays_poll id=7]

कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचा मनमाड शहरात पुतळा उभारावा : भाकप ची मागणी

Jul 19, 2022


मनमाड नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष,स्वातंत्र्य सैनिक, माजी आमदार, विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या नावाने शहरात कमान उभारण्यात यावी अशा आशयाचे निवेदन कम्युनिस्ट पक्षातर्फे मुख्याधिकारी डॉ.सचिन कुमार पटेल यांना देण्यात आले.
स्वतंत्र भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारने स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या नावाने राहत असलेल्या ठिकाणी पाट्या लावणे, रस्त्याला , चौकला नाव देणे, कमान उभारणे आदी उपक्रम सांगितले आहे.त्या प्रमाणे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार, माजी नगराध्यक्ष, विधान परिषदचे पाहिले विरोधी पक्षनेते , भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या नावाने कमान व पुतळा उभारण्यात यावा.तसेच मनमाड शहरातील स्वातंत्र्य सैनिकच्या राहत असलेल्या मार्गला , चौक ला नाव द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्ष उभारेल असा इशारा निवेदन द्वारे दिला आहे.
या निवेदनावर भाकप राज्य सचिव कॉ.राजू देसले,कॉ. अॅड.साधना गायकवाड, भाकप जिल्हा सहसचिव कॉ.सुभाष बेदमुथा, कॉ.विजय दराडे, कॉ.दामु पाटील, कॉ.संपत जाधव, कॉ.सुखदेव केदारे आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.