नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे) नांदगाव शहराला होणाऱ्या दुषीत पाणी पुरवठ्याबाबत भाजपा कडून नांदगाव न. पा स निवेदन देण्यात आले.
याबाबत वृत असे की गेल्या २ ते ३ महिन्यापासून नांदगाव शहराला दुषीत पाणी पुरवठा होत आहे . शहराला गिरणा धरणातून होणारा पाणी पुरवठा २ ते ३ महिन्यापासून बंद आहे . न. पा च्या मालकीच्या दहेगाव धरणातून पाणी पुरवठा होत आहे. यासाठी न. पा कडे पाणी शुद्वीकरण यंत्रणा नाही . त्यामुळे नळाद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठा हा ८०० पेक्षा जास्त टी. डी. एस चा असून हे पाणी मानवी आरोग्यास प्रंचड हानीकारक आहे. मानवी शरीरास २०० पेक्षा जास्त टी. डी. एस हे धोकादायक असतात .

तसेच शहरात घाणीचे साम्राज्य मोठया प्रमाणात पसरले असून शहरात रोगराई वाढत आहे. येत्या आठ दिवसात पाणी पुरवठयात सुधारणा नही झाली तर भाजपा कडून मोठे आंदोलन उभारण्यात येईल असे निवेदन मुख्याधिकारी विवेक धांडे यांना देण्यात आले .
सदर निवेदनावर भाजपा शहरप्रमुख उमेश उगले, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बनकर,संजय सानप,दत्तराज छाजेड,अमोल गायकवाड,डॉ निकम,राजाभाऊ गांगुर्डे,भावराव महाराज निकम आदीच्या सह्या आहे.












