loader image
[ays_poll id=7]

१५ दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास आत्मदहनाचा इशारा

Jul 19, 2022


मोरझर, आझाद नगर ( पिंजारवाडी) येथील नागरिक, शालेय विद्यार्थी, शेतकरी बंधू भगिनी हे भोसले वाडा ते नांदगाव रोड ह्या जिल्हापरिषद रोड पासून रेल्वे लगत दक्षिणेला असलेल्या जागेचा वापर रहदारी साठी करत आहेत. पावसामुळे ह्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून नांदगाव ला जाण्यासाठी येथील नागरिकांना, शेतकरी बांधवांना व शालेय विद्यार्थ्यांना पर्यायी मार्गच नसल्याने ह्या सर्वांचे अतोनात हाल होत आहे. रेल्वे विभागाच्या तिसऱ्या लाईन मुळे आता रस्ताच शिल्लक राहिलेला नसून १५ दिवसात मोरझर, आझाद नगर वासियांना पर्यायी रस्ता जोडून देण्यात यावा अशी मागणी सरोदे वस्ती येथील तकदिर पूंजाबा सरोदे यांनी दिंडोरी लोकसभेच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारती ताई पवार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या १५ दिवसात रस्त्याचा प्रश्न न सुटल्यास सरोदे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला असून होणाऱ्या सर्व परिणामांना प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.