loader image
[ays_poll id=7]

नांदगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकावर चाकूने हल्ला

Jul 20, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव रेल्वे स्टेशनवरील रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक धर्मेंद्रकुमार तिवारी यांच्यावर लोकेश तिडके ह्या युवकाने धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडल्याने नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटे पाच (५) वाजेच्या सुमारास नागपूर-पुणे एक्सप्रेस नांदगाव रेल्वे स्टेशनवर थांबली असता लोकेश लिलाधर तिडके रा.नांदलपार जि.गोंदिया हा युवक उतरला असताना तो नांदगाव स्थानकावर संशयास्पदरित्या फिरत असल्यामुळे  रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी ए.के. खान यांनी रेल्वे टिकिट संदर्भात त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने कर्मचाऱ्यांने त्यास चौकशीसाठी रेल्वे  सुरक्षा बलाच्या कार्यालयात बसविले असता  सुरक्षा बलाचे निरीक्षक धर्मेंद्र कुमार तिवारी कार्यालयात आले असता त्याची चौकशी करण्या अगोदरच लोकेशने कार्यालयाचा दरवाजा आतून बंद करून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला त्यात त्यांच्या पोटात वार करून तो बाहेर पळाला दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तुषार पांडे, गोविंद खैरनार यांनी तिवारी यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


हल्लेखोराने शस्त्राचा धाक दाखवत तब्बल चार तास शहर पोलीस व रेल्वे पोलीस आणि सुरक्षा बलाचे जवानांना झुंजवत ठेवले. दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक तिवारी यांना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी मालेगाव येथे खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकास नांदगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलीस,शहर पोलीस, सुरक्षा बलाचे जवान आणि नागरिकांच्या मदतीने शिताफीने रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी चाळीसगाव येथील रेल्वे चे पोलीस निरीक्षक शब्बीर शेख यांनी धाव घेतली असून ते परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.