loader image
[ays_poll id=7]

प्रदीप गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शालोपयोगी वस्तूंचे वाटप

Jul 21, 2022


ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


संत बार्णबा माध्यमिक विद्यालय मनमाड येथील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रदीप गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय उपयोगी वस्तू चे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चे अध्यक्ष रत्नदीप पगारे,पी.डब्ल्यु.आय.सुशीलकुमार, सामाजिक कार्यकर्ते संजय कटारे, ओपन लाईन चे सचिव चेतन अहिरे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे कार्याध्यक्ष सुमित अहिरे आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी.पी.गरुड सर हे होते.
यावेळी सतिश भाऊ केदारे,दिपक अस्वले,पी.पी.गरुड, रत्नदीप पगारे, प्रदीप गायकवाड आदी चे भाषणे झाली.
शाळेचे सर शैलेश जाधव यांची संत बार्णबा देवालय च्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला.
तसेच शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्याचे स्वागत करण्यात आले व प्रदीप गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, सुरेश अहिरे, राहुल केदारे, शंकर गाडे, कल्याण धिवर, सुभाष जगताप, सुनिल सोनवणे,शरद झोंबाड, अजित जगताप, राहुल शिंदे, संदिप पगारे, दिपक अस्वले, अनिल अहिरे, राहुल केदारे,रोहन उबाळे, सतिश झाल्टे, अजित जगताप, वसंत सोनवणे, किरण आहीरे, निलेश इंगळे, साईनाथ लांडगे, अर्जुन बागुल आदी ने केले.


तसेच सकाळी करूणा केअर सेंटर येथे फळ वाटत प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सतिश भाऊ केदारे, विजय गेडाम, रत्नदीप पगारे, सुरेश अहिरे,चेतन अहिरे, सागर गरूड, वसंत सोनवणे, राहुल केदारे, अनिल अहिरे,अर्जुन बागुल, शंकर गाडे, संतोष गाडे, प्रथमेश जाधव आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.