मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन तर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आज शाळेत पार पडला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक चिंतन आनंद परदेशी, द्वितीय – आरध्या विशाल झालटे, तृतीय – अन्वी अजित झाडे व चतुर्थ – राहुल गौतम गोतीस तसेच उत्तेजनार्थ अक्षदा राकेश सिनकर व प्रतिक्षा गणेश क्षीरसागर यांनी बक्षिसे पटकावली. या प्रसंगी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन चे बॉटलिंग प्लांट ट्रान्सपोर्टर अरिहंत रोडलाइन्स चे मनोज छाबडा यांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, वैभव कुलकर्णी,धनंजय निंभोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सौ.वैशाली रसाळ व सौ.स्वाती बिडवे मॅडम यांनी केले.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











