नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे ) नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक येथील जनार्धन कवडे वय (५०) या शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली.
याबाबत वृत असे की तालुक्यातील बाणगाव बुद्रुक येथील शेतकरी जनार्धन कवडे यांचे दिवंगत वडील छगन कवडे यांनी शेतीसाठी बँकेचे दोन लाख रूपये कर्ज घेतले होते . पंरतू ते कर्ज फेडू शकले नाही . पर्यायाने ते मयत झाल्यावर ते कर्ज जनार्धन व भाऊ यांच्या नावावर आले शासनाने कर्जमाफीची घोषणा केली पंरतू त्या कर्जमाफीच्या निकशात दोन लाख रुपयांची रक्कम येत नव्हती कर्जफेड करण्यासाठी भावडांचे एकमत होत नव्हते त्यामुळे कर्ज भरले गेले नाही. कर्ज थकीत असल्याने नवीन पीक कर्ज मिळत नव्हते. त्यामुळे शेतीचे नियोजन करण्यात अडचण येत होती. त्यामुळे आर्थिक अडचण येत होती. आज ना उद्या कर्जमाफी होईल या आशेवर असलेल्या जनार्धन यांचा संयमाचा बांध अखेर फुटला . वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले . त्याच्यां पश्चात भाऊ,पत्नी,दोन मुली,मुलगा,सुन असा परिवार आहे .

फलक रेखाटन दि.१०जुलै २०२५. गुरुपौर्णिमा
गुरु म्हणजे 'मार्गदर्शक' आणि पौर्णिमा म्हणजे 'प्रकाश' गुरु कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन...