लेंडी हट्टी मु.पो.ता. चांदवड येथील रहिवासी असलेले कै.बाळू दामु पवार यांचे नुकतेच दुर्धर आजाराने निधन झाले. भारतीय स्टेट बँक शाखा-चांदवड येथे कै.बाळू दामु पवार यांचे बचत खाते होते. कै.बाळू यांना नुकतेच दुर्धर आजाराने ग्रासले होते चांदवड येथे खाजगी रुग्णालयात कै.बाळू पवार यांचेवर उपचार चालू होते पण दुर्दैवाने दि.15/06/2022 रोजी कै.बाळू पवार यांचे निधन झाले. पण, तत्पूर्वी कै.बाळू पवार यांनी आपल्या बचत खात्याला प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काढलेले होते. घरातील कर्ता पुरूषाचा अवेळी म्रुत्यु झाल्याने पुर्ण कुटुंब आर्थिक अडचणीत सापडते पण कै.बाळू पवार यांनी प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा हप्ता भरलेला असल्याने त्यांची पत्नी श्रीमती संगिता बाळू पवार यांचे नाव विम्याला वारसदार म्हणून होते. दि. 30/06/2022 रोजी श्रीमती संगीता पवार यांनी शाखाधिकारी श्री.प्रशांत मोदी साहेब यांना मयत बाळू पवार यांच्या म्रुत्यु बद्दल प्राथमिक माहिती दिली शाखाधिकारी श्री.प्रशांत मोदी साहेब व उपशाखाधिकारी श्री.निलेश पाटील साहेब यांनी श्रीमती संगिता बाळू पवार यांना विमा संरक्षण मिळणेकामी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे श्रीमती संगिता बाळू पवार यांनी दि.04/07/2022 रोजी उपशाखाधिकारी श्री.निलेश पाटील साहेब यांचेकडे कागदपत्रे जमा केली शाखाधिकारी श्री.प्रशांत मोदी साहेब व निलेश पाटील साहेब यांनी श्रीमती संगिता पवार यांच्या विमाच्या अर्जावर तत्पर कार्यवाही करून सर्व कायदेशीर पुर्तता केली व पुढील कार्यवाही साठी प्रकरण मुख्य कार्यालयात मंजुरी साठी पाठवले व वेळोवेळी त्याप्रकरणाचा पाठपुरावा करून अवघ्या 14 दिवसांत विमा प्रकरणाला मंजुरी मिळून दि. 18/07/2022 रोजी रु. 200000/- (दोन लाख) चांदवड शाखेकडे वर्ग करण्यात आले तसेच विमाच्या परतावा दावासाठी मा.तहसीलदार यांचा दाखला आवश्यक असतो तो मा.तहसीलदार श्री.प्रदिप पाटील साहेबांनी एका दिवसात दिल्याने प्रकरण वेळीच मार्गी लागले
आज दि.22/07/2022 रोजी सकाळी 10:30 वा.भारतीय स्टेट बँक शाखा चांदवड येथे मा.तहसीलदार श्री.प्रदिप पाटील साहेब व शाखाधिकारी श्री.प्रशांत मोदी साहेब यांच्या हस्ते धनादेश श्रीमती संगिता पवार यांना प्रदान करण्यात आला
याप्रसंगी उपशाखाधिकारी श्री निलेश पाटील साहेब,हेमंत पाटील साहेब,विलास जाधव,बंटीदास शर्मा, अक्षय नांदगावकर, सुनिल खैरनार श्रीमती स्नेहा शुक्ला, श्री अन्वेश रेड्डी,SBI ग्राहक सेवा केंद्र संचालक दत्तात्रय(आबा)गांगुर्डे ,विजय कोटकर,किरण जाधव,राजू कानडी आंदीसह बँक खातेदार उपस्थित होते
या विमायोजने संदर्भात अधिक माहिती शाखाधिकारी श्री.प्रशांत मोदी साहेबांनी सांगितले कि भारतीय स्टेट बँकमधे बचतखातेदारास प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री जिवन सुरक्षा विमा योजना उपलब्ध असते अनुक्रमे रुपये 436/- व रुपये 20/- वार्षिक हफ्ता असून प्रत्येक खातेदारांने आपल्या शाखेशी किंवा SBI ग्राहक सेवा केंद्रात जाऊन आपल्या खात्याला दोन्ही योजना चालू करून आपले कुटुंब सुरक्षित करावे नाममात्र हफ्ता असल्याने व सरकारी विमा योजना असल्याने श्रमिकवर्ग सुध्दा या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि आत्ता बँकेची प्रणाली पुर्वी पेक्षा अधिक अद्ययावत झाल्याने विमा दावाला लवकरात लवकर मंजुरी मिळते फक्त योग्य कागपत्रांची पुर्तता वारसदारांनी वेळेवर करावी तसेच भारतीय स्टेट बँक मधील (शाखा-चांदवड) बचतखातेदारांना विनंती करण्यात येते की सर्वांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा












