loader image
[ays_poll id=7]

भगवा फडकणारच ; प्राण जाये पर वचन न जाये – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

Jul 23, 2022


युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा शुक्रवारी मनमाड शहरात आली असता येथील साई प्रसन्न लॉन्सवर शिवसंवाद मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना म्हणाले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणार्यांना उत्तर देण्यासाठी बांधील नाही असे सांगितले. मेळाव्याला शिवसैनिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना श्री. ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला सोडून गेलेले चाळीस गद्दार रोज नव नवी कारणे देत आहेत. विधीमंडळात आल्यानंतर यांना आमच्याशी नजर मिळवण्याची हिंमत राहिली नाही. मात्र आता ते गुंडगिरीची भाषा करीत आहेत. मात्र मी त्यांना सांगतो गुंडगिरीचे दिवस गेले. गुंडगिरी करून काहीच होत नाही. जनतेची सेवा करा, लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. मात्र गद्दारी केली तर तुम्हाला जनता माफ करणार नाही.गद्दार गेले ते गेले.. जाऊ द्या.. भगवा फडकणारच प्राण जाय पर वचन ना जाय अशी आमची भूमिका आहे उद्धव ठाकरेंचे सरकार चांगले चालू होते देशभरात कौतुक होत होते देशातील ५ मुख्यमंत्र्यांमध्ये ते अग्रस्थानी होते ४० गद्दाराच्या मनात गद्दारी होती बाळासाहेबांचा पुत्र मुख्यमंत्री झाल्याचे त्यांना सहन झाले नाही त्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला लोक म्हणतात, राजकारण वाईट असतं. या चाळीस लोकांनी ते अत्यंत खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे, असे सांगून ठाकरेंनी उपस्थितांना विचारले, तुम्ही या गद्दारांबरोबर रहाल का?. तेव्हा उपस्थितांनी आमदार गद्दार आहे.

गद्दारांबरोबर जाणार नाही. शिवसेना झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेक कार्यकर्ते यावेळी त्वेषाने बंडखोरांना दूषणे देत होते. माझ्यावर ठाकरे घराण्याचे संस्कार आहेत. त्यामुळे मी सोडून गेलेल्या आमदारांविषयी वाईट बोलणार नाही. माझ्या मनात त्यांच्या विषयी कोणतिही वाईट भावना नाही. मात्र त्यांनी जे शिवसेना, शिवसेनेचे कार्यकर्ते व मतदारांच्या भावनेशी खेळ केला, त्याबाबत त्यांना कधीही माफी मिळणार नाही. मला व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजकारण कळत नाही, हे मी मान्य करतो. कारण बाळासाहेबांनी आम्हाला २० टक्के समाजकारण व ८० टक्के राजकारण हे संस्कार दिले आहेत. तोच शिवसेनेचा मंत्र आहे. आम्हाला राजकारण करता आले नाही, त्याबाबत मी माफी मागतो, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, आम्ही जर राजकारण केले असते, तर ज्या आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला, तो ठेवला नसता. आम्ही विरोधी पक्षांना त्रास दिला असता. स्वतःच्या आमदारांवर लक्ष ठेवले असते.

विरोधकांना नोटिसा पाठवल्या असता पोलिस व अन्य यंत्रणां मागे लावल्या असत्या. पण आम्ही ते केले नाही. आम्ही फक्त महाराष्ट्राच्या हितासाठी काम करतो आणि ते करत राहणार. शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागुल, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार नरेंद्र दराडे, दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्क प्रमुख अल्ताफ खान, प्रवीण नाईक, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, मालेगावचे प्रमोद शुक्ला, रामा मिस्तरी, ज्येष्ठ शिवसैनिक रउफ मिर्झा, हरीश असर,जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, अंकुश गवळी, शहरप्रमुख मयूर बोरसे संगीता नौलखा, सुरेखा मोरे, श्रीमती किरण शिंदे,
एड सुधाकर मोरे, संतोष जगताप यांनी सूत्रसंचालन केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.