loader image
[ays_poll id=7]

श्री परशुराम प्रतिष्ठान तर्फे गुणगौरव सोहळा संपन्न

Jul 25, 2022


24/7/2022 रविवार रोजी इंडियन हायस्कूल येथे श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड तर्फे गुणगौरव सोहळा २०२२ उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्कृष्ट साहित्यिक ,कवी लेखक, तसेच छत्रे हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री संदीप देशपांडे सर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री समीर कुलकर्णी व श्री द्वारकानाथ झांबरे हे होते.सूत्रसंचलन श्री रोहित कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाचे. प्रास्ताविक श्री विवेक हातेकर तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री युवराज बळेल यांनी केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री भगवान परशुराम तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, चि. अर्णव ढोबळे याने ‘प्रथम तुला वंदितो’ हे गाणे बासरीवर उत्तम रित्या सादर केले, शाल व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर कुलकर्णी यांनी केले, त्यानंतर श्री संदीप देशपांडे सर यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ‘अभ्यासासोबत इतर क्षेत्रातही आपण प्राविण्य मिळवले पाहिजे तसेच समाजामधील समस्या व त्यावरील उपाय यावर त्यांनी भाष्य केले. श्री गजानन क्षिरसागर यांनी त्यांचा नर्मदा परिक्रमाचा अनुभव सर्वांसमोर मांडला.श्री प्रकाश कुलकर्णी व श्री द्वारकानाथ झांबरे सर यांनी प्रतिष्ठान करत असलेल्या कार्याचे कौतुक करून पुढे जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व कार्यास हातभार लावण्याचे आवाहन केले यावेळी प्रचिती दिंडोरकर, शर्वरी कुलकर्णी, अवधूत काकडे, स्वरा धर्माधिकारी, दूर्वा जोशी, अर्णव ढोबळे, वैष्णवी दुबे, प्रणव दिंडोरकर, अपेक्षा चंद्रात्रे, श्रीवर्धनी गोरे, यश दुबे, वेदांत जोशी, रितांशी गंगेले, पूर्वा लाळे, सुजल पांडे, वल्लभी सप्रे, मानसी गंगेले, सृष्टी गंगेले, पृथा सप्रे, ज्ञानेश्वरी चंद्रात्रे, भार्गवी बेंद्रे, सर्वेश जोशी, समय पांडे, दर्शना जोशी, गायत्री गोरे, सुजल जोशी, पूजा लाळे, साक्षी पांडे, स्वराली दिंडोरकर, अविनाश कुलकर्णी या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. श्री व सौ गजानन क्षिरसागर तसेच रेल्वे सल्लागार समिती मनमाड येथे निवड झाल्याबद्दल श्री आनंद भाऊ काकडे व श्री हर्षद गद्रे सर यांचा योगा शिक्षिका सौ स्वातीमुळे तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्री विक्रम सप्रे तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौराई मंडळ मनमाड यांचा रेल्वे क्षेत्रीय समितीपदी श्री नितीन पांडे यांची निवड झाल्याबद्दल तसेच कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल श्री समिर कुलकर्णी यांना कोरोना योद्धा हा पुरस्कार देण्यात आला, तसेच संस्कृती संवर्धन समिती, मनमाड ही अविरतपणे व्याख्यानमाला आयोजित करीत आहे या कार्याबद्दल समितीचे अध्यक्ष श्री प्रमोद मुळे, श्री रमाकांत मंत्री, श्री आनंद काकडे, श्री प्रसाद दिंडोरकर यांचा गुणगौरव, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. आभार प्रदर्शन श्री उमेश कुलकर्णी यांनी केले त्यानंतर कोरोना काळात व चालू वर्षात ज्यांना देवाज्ञा झाली त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संयोजन श्री उमेश कुलकर्णी, श्री प्रसाद दिंडोरकर, श्री रोहित कुलकर्णी, वेदिका महिला मंडळ मनमाड या सर्वांनी केले.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.