आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेतर्फे मे महिन्यात मनमाड-वंजारवाडी- कऱ्ही-माळेगाव ही बस सेवा सुरू करण्यासाठी बस प्रशासनास निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. सातत्याच्या पाठपुराव्याला आज यश मिळाले असून कोरोना काळापासून सदर बस सेवा बंद करण्यात आली होती.ही बस सेवा आजपासून पूर्ववत सुरू झाली आहे.
मनमाड बस डेपोचे लाडवंजारी यांच्या उपस्थितीत युवती व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नारळ वाढवून बसची पूजा केली. बसचे चालक-मालक व लाडवंजारी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आभार व्यक्त केले. या नंतर सर्व युवती व महिलांनी स्वतः या बस ने सटाणे, वंजारवाडी कऱ्ही माळेगाव व परत मनमाड असा प्रवासही केला.या वेळी प्रत्येक गावात बस चे स्वागत करण्यात आले.गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सदर बस सेवा सुरू झाल्यामुळे समाधान व्यक्त केले. नागरिकांनी आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांचे आभार व्यक्त केले.

मनमाड कऱ्ही माळेगाव या भागातील असंख्य शालेय विद्यार्थी व मनमाड शहरात येणाऱ्या नागरिकांना आता बस सेवा उपलब्ध झाल्यामुळे मोठी गैरसोय दूर झाली आहे.
याप्रसंगी बोलताना संगीता बागुल यांनी आमदार सुहास अण्णा कांदे तसेच बस प्रशासनाचे आभार व्यक्त केले यांच्या प्रयत्नामुळेच आज ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली. सामान्य जनतेच्या प्रश्नांवर सदैव युवती सेना व महिला आघाडी न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत राहील असा विश्वास संगीताताई बागुल यांनी बोलून दाखवला.
या प्रसंगी शिवसेना महीला आघाडीच्या संगीता बागुल, युवती सेनेच्या पूजा छाजेड, शितल आरणे, बुशरा शेख, कोमल भालेराव, सृष्टी देशमुख, उज्वला मिसर, पायल पवार,कोमल गुंडगळ आदी उपस्थित होते.












