मनमाड शहरात गेल्या ५० वर्षापेक्षा जास्त असणारी स्पर्धेची परंपरा टिकवित मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यंदाही स्व.लोकमान्य टिळक व स्व.अण्णाभाऊ साठे या महान लेखकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रविवार दि.२४ जुलै २०२२ रोजी छत्रे हायस्कूल येथे आंतरशालेय निबंध स्पर्धा संपन्न झाल्या. शालेय विद्यार्थ्यांना विविध विषय वाचनाची गोडी लागावी, लिखाणाची गोडी लागावी म्हणून या निबंध स्पर्धेचे आयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सातत्याने ५० वर्षापेक्षा अधिक काळापासून करण्यात येत आहे.

सध्या संगणक, मोबाईल, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप अशा विद्यार्थ्यांना आकर्षित करणार्या सोशल मिडीयाचे वातावरण असतांना देखील दोन वर्षे कोविड चा काळानंतर देखील मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित या निबंध स्पर्धेला १४ पेक्षा जास्त विद्यालयातील ४६७ शालेय विद्यार्थी व विद्यार्थींनीनी उदंड असा प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. यात प्रामुख्याने छत्रे न्यु इंग्लिश स्कुल, मरेमा विद्यालय, गुरुगोबिंद सिंह हायस्कूल, के.आर.टी.विद्यालय, गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल, केंद्रीय विद्यालय, एच.ए.के.हायस्कूल, संत बार्णबा हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल,मनोरमा सदन आदी प्रमुख विद्यालयांचा समावेश आहे. या निबंध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना १० दिवस आधी स्पर्धेचे विषय कळविण्यात येतात. ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम ३ व ३ उत्तेजनार्थ अशी दोन्ही गटांना पारितोषिके तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर सहभाग प्रमाणपत्र सोमवार १ऑगस्ट २०२२ रोजी बक्षिस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणे हे आजच्या काळात अतिशय धाडसाचे आहे. तरीदेखील या कठीण काळातही मनमाड सार्वजनिक वाचनालय या स्पर्धेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना आपली लेखनकला दाखविण्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे ही मनमाडच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अभिमानाची बाब आहे. या निबंध स्पर्धेचे नियोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष प्रदीप गुजराथी, सुरेश शिंदे उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट संचालक नरेश गुजराथी यांनी केले तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अक्षय सानप, मंगेश वाणी सर,, अभिषेक पितृभक्त ,मच्छिंद्र साळी सिद्धेश परब, खंबाईत सर आदी मान्यवरांचे अनमोल सहकार्य लाभले. या स्पर्धेचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. संध्या गुजराथी , हेमंत मटकर, सौ.नंदिनी फुलभाटी आदींनी केले.












