loader image
[ays_poll id=7]

केंद्रीय विद्यालय मनमाड : दहावीत हर्षदा लाड प्रथम

Jul 25, 2022


दिनांक २२ जुलै रोजी इयत्ता दहावीचा सीबीएससी चा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत मनमाडच्या केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. ६५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तम गुण संपादन करून यशस्वी झाले. हर्षदा लाड ९३.४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम, वंश कातकडे ९१. ६ टक्के गुण द्वितीय आला. तसेच मोक्षिता भंडारी व श्रेयस घाडगे ९१.२ टक्के तृतीय क्रमांक व आदिती देव ८९.६ टक्के मिळवत चतुर्थ क्रमांक मिळविला. मोहित लुनावत याने ८५.४ टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे रेल्वे कारखान्याचे मुख्य प्रबंधक व केंद्रीय विद्यालयाचे चेअरमन मयंक सिंग, प्राचार्य सुनील परदेशी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य सुनील परदेशी, विनोद माळी, अनिल झिंजवाडिया, मनोज मलासी, दिनेश जांगिड , सोनाली गुंडगळ इत्यादी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.