Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

केंद्रीय विद्यालय मनमाड : दहावीत हर्षदा लाड प्रथम

Jul 25, 2022

दिनांक २२ जुलै रोजी इयत्ता दहावीचा सीबीएससी चा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत मनमाडच्या केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. ६५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तम गुण संपादन करून यशस्वी झाले. हर्षदा लाड ९३.४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम, वंश कातकडे ९१. ६ टक्के गुण द्वितीय आला. तसेच मोक्षिता भंडारी व श्रेयस घाडगे ९१.२ टक्के तृतीय क्रमांक व आदिती देव ८९.६ टक्के मिळवत चतुर्थ क्रमांक मिळविला. मोहित लुनावत याने ८५.४ टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे रेल्वे कारखान्याचे मुख्य प्रबंधक व केंद्रीय विद्यालयाचे चेअरमन मयंक सिंग, प्राचार्य सुनील परदेशी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य सुनील परदेशी, विनोद माळी, अनिल झिंजवाडिया, मनोज मलासी, दिनेश जांगिड , सोनाली गुंडगळ इत्यादी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात लोकमाता महिलारत्न पुष्पाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन “काव्यपुष्प” वाचन स्पर्धा कार्यक्रम संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. ए....

read more

मनमाड च्या कार्यकर्त्यांचा ना भुजबळांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]