loader image
[ays_poll id=7]

नांदगाव बस आगारातील कालबाह्य बसेस बदला: मनसेची मागणी

Jul 25, 2022


नांदगाव(सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव एस .टी .आगारातील खराब व कालबाहय झालेल्या एस . टी . बसेस बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदग़ाव च्या वतीने आगार प्रमुख विश्वास गावीत यांना तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात यांच्यावतीने निवेदन देण्यात आले
याबाबत वृत असे की नांदगाव एस टी बस आगारातील बहुसंख्य बस या खराब व नादुरस्त झालेल्या आहे. या बसेस कुठेही बंद पडतात . तसेच काही बसेस गळक्या आहे पाऊस चालू असताना पुर्णपणे गळतात कालबाह्य बसेस तात्काळ सेवेतून कमी कराव्यात तसेच इथून पुढे कालबाह्य बसेस अजिबात वापरू नयेत. बस आगारातून बाहेर पडताना व्यवस्थित मेंटेनन्स करूनच बस बाहेर काढावेत. बस रस्त्यात बंद पडणे अथवा धक्का देणे नको ,बस आगारातून वेळेवर निघाली पाहिजेत. ज्या बस बंद आहेत त्या पूर्वीच्या वेळेनुसार पूर्ववत चालू करावेत. लांब पल्यासाठी नवीन बस चालू करावेत शाळा सुटतांना पासधारक विद्यार्थ्यांचे हाल होतात. चेंगराचेंगरी होते. शक्य असल्यास जादा बस देण्याचे करावे बस वर फलक व्यवस्थितपणे लावावे .अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल सदरील निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रदीप भाऊ थोरात ,तालुका सचिव अभिषेक विघे, शहर उपाध्यक्ष मयूर खरोटे ,शहर संघटक मयूर कुलकर्णी ,विद्यार्थी सेनेचे लकी खैरे ,बळीराम सदगीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.