loader image
[ays_poll id=7]

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव : शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्याची आव्हाड यांची मागणी

Jul 26, 2022


भारतीय स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त मनमाड शहरात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यास रंगरंगोटी,विद्युत रोशनाई व पुतळयाच्या परिसरात स्वच्छता करणेबाबत मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांच्याकडे कामगार नेते बळवंत आव्हाड यांनी मागणी केली आहे.
भारताला स्वांतत्र मिळुन ७५ वर्ष पुर्ण होत आहे.त्या निम्मिताने केंद्रात आणि राज्यात हा ७५ वा अमृतमोहत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे. म्हणुन मनमाड शहरात असलेल्या महापुरुषांच्याच्या पुतळयास रंगरंगोटी,विद्युत रोशनाई नगरपरिषदच्या माध्यमातुन व्हावी.त्याचप्रमाणे मनमाड शहरामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक भारतीय स्वांतत्र्यांच्या लढयात सहभागी होते.अनेकाना भारत सरकार कडुन राज्य सरकारच्या माध्यमातुन तांम्रपट दिलेले आहे.तसेच भुमिगत आणि शिक्षा झालेल्या स्वांतत्र सौनिकाच्या आज रोजी हयात असलेले त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा या ७५ वा अमृतमोहत्सव निमित स्वांतत्र्याची आठवण म्हणुन सत्कार समारंभ अयोजित करावा. त्याचप्रमाणे स्वांतत्र सैनिकाची यादी महात्मागांधी याच्या पुतळ्या जवळ प्रसिध्द केलेली आहे याची नोंद घ्यावी . ” मनमाड नगरपरिषद प्रशासन अधिकारी म्हणुन आपण यास प्राधान्य दयावे, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.