loader image
[ays_poll id=7]

दोन मोबाईल चोरांना शिताफीने अटक ; मनमाड लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

Jul 27, 2022


धावत्या रेल्वे प्रवाशी गाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन इसमांना मनमाड लोहमार्ग पोलिसांनी काल अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २६ जुलै रोजी रमाशंकर छोटेलाल पाल रा. मिर्जापुर, उत्तर प्रदेश हे महानगरी एक्सप्रेसने प्रवास करत असताना त्यांचा झोपेचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून एक विवो कंपनीचा मोबाईल किंमत ७ हजार रुपयेचां मोबाईल चोरी झाल्याची फिर्याद मनमाड लोहमार्ग पोलीस दिली. दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करून तत्काळ रेल्वे रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी आणि रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना संशयित इसम गणेश मनोज जाधव राहणार घाटकोपर मुंबई असा मोबाईल सह मिळून आला त्याच्याकडे अधिक चौकशी करता महानगरी एक्सप्रेस वर नाशिक ते मनमाड दरम्यान एक मोबाईल चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आहे. माननीय लोहमार्ग न्यायालय मनमाड येथे हजर करण्यात आले असता न्यायालयाने जेल कस्टडी दिली आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये २८ फेब्रुवारी रोजी संजय परशुराम जाधव रा. ठाणे हे अमृतसर एक्सप्रेस मध्ये गाडी चढत असताना त्यांच्या खिशातून त्यांचा एक सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचा मोबाईल किंमत ३० हजार रुपयाचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरून नेले. असे मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात फिर्याद दिली दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलीस स्थानकात चोरीच्या गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्यात पोलीस अधीक्षक लोहमार्ग औरंगाबाद येथील सायबर सेल कार्यालयातून मोबाईल ट्रेसिंग अहवाल प्राप्त झाले होते. अहवालाप्रमाणे तपास करून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच राजू विश्वनाथ क्षीरसागर रा. सुरत याचा शोध घेऊन अटक करून मनमाड न्यायालय येथे हजर करण्यात आले.न्यायालयाने जेल कस्टडी दिली आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.