छत्रे विद्यालयाची विद्यार्थिनी एन सी सी कॅडेट ज्ञानेश्वरी चव्हाण हिने राष्ट्रीय छात्र सेनेच्या 50 महाराष्ट्र बटालियन Ncc च्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात रायफल शूटिंग मध्ये प्रथम क्रमांक मिळविला व तिची आंतर बटालियन रायफल शूटिंग साठी 50 महाराष्ट्र बटालियन तर्फे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे,ग्रामीण भागातून आलेल्या ज्ञानेश्वरी ने आपल्या उपजत गुणांच्या आधारे रायफल शूटिंग मध्ये चमकदार कामगिरी करीत सर्वांना आश्चर्यचकीत केले असून एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून भविष्यात नक्कीच राष्ट्रीय पातळीवर मजल मारणार आहे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक आर एन थोरात, पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे,50 महाराष्ट्र बटालियन चे हवालदार भुपेंद्रसिंग यांचे हस्ते ज्ञानेश्वरी चा सन्मान करण्यात आला
ज्ञानेश्वरी ला छत्रे विद्यालयाचे प्रभारी एन सी सी ऑफिसर समाधान ठाकूर सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











