loader image
[ays_poll id=7]

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “ऊर्जा महोत्सव” कार्यक्रमाचा शुभारंभ ‘वीज देशाच्या प्रगतीतील अत्यंत महत्वपूर्ण घटक’ कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे प्रतिपादन

Jul 27, 2022


नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य “अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव पॉवर@२०४७” या ऊर्जा महोत्सवाचे केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने राज्यभर आयोजन करण्यात येत असून राज्य आणि केंद्र सरकारमधील आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी आज बुधवार २७ जुलै रोजी ऑफिसर्स क्लब, एकलहरे निर्मिती केंद्र परिसर, नाशिक येथे या महोत्सवाचा आयोजित समारंभाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्यातील महावितरणच्या वतीने विद्युतीकरणाच्या विविध योजनांचा जागर विविध माध्यमांद्वारे या महोत्सवात करण्यात आला, यावेळी कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी वीज/ ऊर्जा देशाच्या प्रगतीतील महत्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन केले.

या महोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महावितरणचे निवृत्त संचालक(प्रकल्प) प्रभाकर शिंदे तर प्रमुख अतिथी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल भारसाकळे, एकलहरे विद्युत निर्मितीचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे, प्रशिक्षण व सुरक्षा केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे राजीव फरलिया व्यासपीठावर उपस्थित होते.
महावितरणचे निवृत्त संचालक प्रभाकर शिंदे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, हरितक्रांती, धवलक्रांती या सारखी वीजक्षेत्रामध्ये ऊर्जाक्रांती होणार असून भविष्यामध्ये पारंपारिक उर्जेवर चालणारी वाहने न राहता इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या वाहनांना प्रचंड मागणी असणार आहेत्यासाठी पारंपरिक ऊर्जास्त्रोत्रावर अवलंबून ना राहता अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. गेल्या काही वर्षांत वीज क्षेत्राने अभूतपूर्व बदल बघितले असून तसेच वीज बचतीसोबत अखंडित वीज पुरवठ्यासाठी व सेवेसाठी वापरलेल्या विजेचे देयक वेळेत भरण्याची सवय ग्राहकांनी लावली पाहिजे असेही आवाहन केले. अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी मार्गदर्शन करताना, कुठल्याही क्षेत्रातील प्रगतीसाठी पॉवर हा महत्वपूर्ण घटक असून देशाच्या विकासात ऊर्जा क्षेत्राने उच्चतम कामगिरी केली असून विजेच्या फायद्यांवर प्रकाश टाकीत, नाशिक जिल्ह्यात ऊर्जा विभागाकडून विविध यॊजनाच्या माध्यमातून झालेल्या कार्याची त्यांनी माहिती दिली. यावेळी प्रास्ताविक करताना मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सांगितले की, विजेशिवाय कुठलेही राष्ट्र स्वयंपूर्ण व महासत्ता होऊ शकत नाही. त्यामुळे विजेची वाढती गरज भागविण्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती वाढवून ऊर्जा क्षेत्राला सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी कार्य सुरु असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात झालेली कामगिरी आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचवून ग्राहकसेवा आणखी वृद्धिगत करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असल्याचे मुख्य अभियंता कुमठेकर यांनी सांगितले. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे राजीव फरलिया यांनी सांगितले की, संपूर्ण देशाला एकाच फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या एका ग्रीडमध्ये जोडले असून जगातील सर्वात मोठे एकात्मिक ग्रिड म्हणून उदयास आले आहे. उज्वल भारत उज्ज्वल भविष्य – पॉवर @ २०४७ च्या छत्राखाली अधिक लोकसहभागासाठी आणि वीज क्षेत्रातील घडामोडींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महोत्सव देशभरात साजरे केले जात असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जा खात्याकडून करण्यात आलेल्या कामाची व योजनेची माहिती विविध चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली. महावितरणच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या जिल्हयातील लाभार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना योजनेबद्दल व दिलेल्या सेवेबद्दल यावेळी आभार व्यक्त केले. सौंदर्य निर्मिती फिल्म अँड थिएटर, नाशिक यांच्या वतीने दोन लघुनाटिका सादर करण्यात आल्या. यामध्ये विद्युत वितरण यंत्रणा सक्षमीकरण व ग्राहक अधिकार आणि कर्तव्य याची माहिती कलावंतानी नाटिकेमधून दिली. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहाय्यक अभियंता प्रदीप गवई आणि यंत्रचालक सुभाष इसोकार यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चिदानंद फाळके व नूतन गांगुर्डे यांनी तर अधिक्षक अभियंता संजय खंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर व रमेश सानप तसेच विविध योजनांचे लाभार्थी ग्राहक, लोकप्रतिनिधी, महापारेषण, महानिर्मिती व महावितरणचे कार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी व कर्मचारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.