मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे सर व संस्था,शाळा समन्वयक अमोल निकम सर यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शाळेचे पर्यवेक्षक अन्सारी शाहिद सर,शेख आरिफ सर व विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थिनी शेख काएनात जुबेर खान,तपस्या आनंदा शिरसाठ, आर्शिन शाहिद शेख तसेच उपशिक्षिका सौ.सविता सचिन कराड मॅडम यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनपटाची माहिती दिली.या निमित्त विद्यार्थ्यांसाठी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनपटावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षिका सौ.सविता सचिन कराड यांनी केले.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











