loader image
[ays_poll id=7]

प्लास्टिक पुनर्वापर आणि स्वच्छ मनमाड कार्यक्रमात सहभागी व्हावे : विकास काकडे

Jul 28, 2022


प्लास्टिक पुनर्वापर आणि स्वच्छ मनमाड कार्यक्रमांतर्गत केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून मनमाड मधील काही नागरिक/व्यवसायिक/डॉक्टर नियमितपणे वापरून झालेले पण स्वच्छ प्लास्टिक जमा करत आहेत. मोरया स्टोअर्सचे श्री प्रर्ज्ञेश भाऊ खांदाट, गुप्ता प्रोव्हीजनचे मुन्ना शेठ गुप्ता, पूजा जनरल स्टोअर्स चे प्रदीप संकलेचा हे ही नियमितपणे व इतर काही दुकानदार अधून त्यांच्या दुकानात निघणारे प्लास्टिक नियमितपणे जमा करत आहेत. सौ. सुरेखा पाटील ,सौ वृंदा शेटे डॉ. विनिता कुलकर्णी यांचेसह अनेक जण या चळवळीत हातभार लावत आहेत आपणही या चळवळीस सहकार्य करावे.घरी किंवा दुकानात निघणारे वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या जमा करून त्या पुनर्वापरासाठी ( म्हणजे त्यापासून पुन्हा नवीन वस्तू तयार करण्यासाठी)
श्री.विकास काकडे यांच्याकडे जमा करू शकता किंवा त्यांना फोन केल्यास ते स्वतः किंवा त्यांचे सहकारी आपल्याकडे येऊन घेऊन जातील. संपर्क.विकास काकडे ,मनमाड.९४२२२४८८३०


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.