loader image
[ays_poll id=7]

ओबीसी आरक्षण शिवाय होणार नगरपरिषद निवडणूक ?

Jul 28, 2022

नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहे. आता ज्या ठिकाणी नगर परिषदांची निवडणूक जाहीर झाली आहे अशा ठिकाणी ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यामुळे नगरपरिषद निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहे. तसंच, कुणाच्या हुकुमानुसार ऑर्डर चुकीच्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करत आहात, असं म्हणत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारून काढले आहे.

नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला फटकारून काढले आहेत.

नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. निकाल दिला त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार आहे
ओबीसी आरक्षणाला परवानगी नसताना निवडणुकीचे वेळापत्रक आधीच जारी करण्यात आले होते. त्यामुळे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.
मे महिन्याच्या आदेशानुसार 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित केल्या जाणार होत्या. ही स्थिती अनेक ऑर्डरमध्ये पुन्हा सांगितली गेली होती. ओबीसी आरक्षणांना परवानगी देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग या 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची पुनर्सूचना करू शकत नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.