मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मनमाड शहर डाक विभागाच्या संयुक्त विद्यमाने अपघात विमा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.२९ व शनिवार दि.३० रोजी एफ.सी.आय.रोडवरील अरिहंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी सदर योजना मनमाड शहरात राबविण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी तर्फे डाक विभागास निवेदन देण्यात आले होते. त्यास डाक विभागातर्फे योग्य प्रतिसाद देत डाक विभागाने सदर योजना मनमाड शहरातील सामान्य नागरिकांसाठी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी आपला विमा करून घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिर विषयी अधिक माहितीसाठी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











