loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

Jul 29, 2022


नांदगाव ( प्रतिनिधी ) ज्ञानदेव तुकाराम.. ज्ञानदेव तुकाराम नामाचा गजर करीत शहरातुन श्री संत शिरोमणी सावता महाराज पालखी काढण्यात आली.गेल्या पाच-सहा दिवसांपासून येथील गोकुळधाम , श्री संत सावता महाराज कंपाऊंड मध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला.या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह,गाथा पारायण व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात नामवंत किर्तनकारांनी आपल्या ओजस्वी वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध करीत हरि किर्तनाचे पुष्पगुंफले. तर श्रीमद् भागवत कथा कथाकार ह.भ.प.समाधान महाराज शर्मा बीड यांनी ग्रंथ महात्मा तर सुदामा चरित्र मोक्ष कथा सांगून कथेची समाप्ती केली. आज गुरुवारी रोजी संत सावता महाराज महानिर्वाण दिनानिमित्त शहरातून श्री. संत सावता महाराज प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकी दरम्यान ज्ञानदेव तुकाराम…. ज्ञानदेव तुकाराम
… विठोबा रुक्माई… विठोबा रुक्माईचा गजर करीत पालखी काढण्यात आली.

पालखीत लहान मुलांजवळ भगवे झेंडे, मिरवणुकीच्या मध्य ठिकाणी महिलांनी डोक्यावर तुळस वृंदावन घेतलेल्या महिला तर केसरी साडी परिधान केलेल्या महिला व शुभ्र कपडे परिधान केलेले पुरुष ,लहान वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पालखी दरम्यान फटाक्याचे आतषबाजी करण्यात आली . तर पालखीवर तोफेतून पुष्पवृष्टी करण्यात आली. येथील श्री संत सावता माळी युवक संघातर्फे प्रमोद त्रिभुवन यांनी पुष्पहार अर्पण केला. तर संघातर्फे प्रसादाचे लाडू वाटप करण्यात आले. यावेळी सुधाकर निकम, श्रावण आढाव , संजय पवार, सचिन जेजुरकर, विजय जाधव, वाल्मीक टिळेकर ,बाळासाहेब खैरनार, प्रवीण सोमासे आदी उपस्थित होते. पालखीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले . तर पालखी मिरवणुकीची सांगता गोकुळधाम श्री संत सावता महाराज कंपाउंड येथे सांगता होऊन महाप्रसाद वाटण्यात आला . गुरुवारी सप्ताह सोहळ्याची सांगता ह .भ. प. श्री. समाधान महाराज शर्मा बीड यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताह सोहळ्याची समाप्ती झाली. भाविकांनी काल्याचे किर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतला. सुंदर संयोजन श्री. संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समितीने केले.

गेल्या दोन वर्षापासून कोरोणाचे सावटामुळे कुठलेच धार्मिक सांस्कृतिक, कार्यक्रम साजरे केले नाही. दोन वर्षानंतर श्री. संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा साजरा होत असताना सप्ताहाचे 134 वे वर्ष असल्याने भाविकांनी विशेषत: महिला वर्गांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवली .

 


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.