loader image
[ays_poll id=7]

श्री नेमिनाथ जैन तंत्रनिकेतनातील प्रथमेश गांगुर्डे याचा “पॉवरलिफ्टिंग १०५ किलो वजनी गटात” प्रथम क्रमांक

Jul 30, 2022

चांदवड, येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री एच. एच. जे. बी. पॉलिटेक्निकमध्ये अध्ययन करत असलेल्या द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी प्रथमेश गांगुर्डे याने राज्य स्तरावर १0५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला आणि पॉवरलिफ्टर असोसिएशनच्या सहयोगात राष्ट्रीय स्तरावर पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २0२२-२३ साठी त्याची निवड झाली. याने जुलै २0२२ रोजी नाशिक येथे झालेल्या सब ज्युनियर पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये हे यश संपादित केले.पॉवरलिफ्टिंग हा एक वैयक्तिक खेळ आहे ज्यामध्ये विशिष्ट वजन आणि वयोगटातील स्क्वॅट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्टमध्ये शक्य तितके वजन उचलणे हे लक्ष्य आहे. ऍथलीट्सना त्यांच्या कमाल क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी तीन प्रयत्न असतात आणि त्यांनी कठोर तंत्र नियमांचे पालन केले पाहिजे जेणेकरून प्रत्येकाची समान रीतीने तुलना केली जाईल. या यशप्राप्ती मागे तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे तसेच मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाचे विभागप्रमुख डी.व्ही.लोहार , तंत्रनिकेतनचे क्रीडा समन्वयक पी.जे.बाफना,

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा. श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी, व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा. श्री राजेंद्रकुमारजी बंब यांनी या बद्दल संबंधितांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.