नाशिक: दि. ०१ ऑगस्ट २०२२
महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज सॊमवारी (०१ ऑगस्ट) रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक लक्ष्मण वसावे व महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, व्यवस्थापक राजा बोढारे, उपव्यवस्थापक सदू जाधव यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











