loader image
[ays_poll id=7]

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त पातालेश्वर महादेव मंदिरामध्ये महारुद्र अभिषेक संपन्न….

Aug 1, 2022


मनमाड :(योगेश म्हस्के)चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते श्रावणाचे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो.

हिंदू पंचागांतील श्रावण हा पाचवा महिना आहे. हा निसर्गरम्य वातावरणासाठी देखील ओळखला जातो. श्रावण महिना भगवान शिव यांना खूप प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा विशेष फलदायी असते. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.

मनमाड येथील पुरातन असणाऱ्या दत्त मंदिर येथील श्री पातालेश्वर महादेव मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने 1008 बेलपत्रांचा महारुद्र अभिषेक महादेव पिंडीवर करण्यात आला. पुढील तीनही श्रावण सोमवार निमित्त पातालेश्वर महादेव मंदिरामध्ये महारुद्र अभिषेकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

दत्त मंदिर परिसरामध्ये श्री पातालेश्वर महादेव , श्री संगमेश्वर महादेव , श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर ही पुरातन महादेव मंदिर आहे. शहरातील भाविकांनी या महादेव मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्ताने पुजा आणि दर्शनासाठी गर्दी केली होती.

मनमाड येथील प्रसिद्ध कलाकार श्री साहिल साळसकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातुन श्रावणी सोमवार निमित्ताने सुंदर अशी महादेवाची रांगोळी काढली.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.