loader image
[ays_poll id=7]

वनवासी कल्याण आश्रम मनमाड शाखे तर्फ शहरातील जनजाती समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

Aug 1, 2022


मनमाड : (योगेश म्हस्के) शहर वनवासी कल्याण आश्रमा तर्फे जनजाती समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर धनंजय जामदार, डॉ. प्रताप गुजराती, या प्रमुख अतिथिंसह इंडियन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका क्रांति कुंजरकर, जामदार वनवासी कल्याण आश्रम मनमाड शाखेचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते , या वेळी बोलताना

डॉ. प्रताप गुजराती यांनी जनजाती समुदायात असलेल्या विविध कलागुण, पारंपारिक ज्ञानाचा वापर व्हायला हवा, त्यांचे आरोग्य सुधारले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

प्रमुख अतिथी धनंजय जामदार यांनी जनजाती समूहाच्या विविध समस्यांचे निराकरण करून देशात एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रम करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. वनवासी कल्याण आश्रमाच्या विविध प्रकल्पांना भेटी देण्याचे उपस्थित त्यांना आव्हान केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले यानिमित्ताने सांस्कृतिक वार्तापत्राच्या स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान या अंकाचे प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, क्रांती कुंजरकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व वनवासी कल्याण आश्रम मनमाड शाखेचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या आयोजना विषयीची भूमिका स्पष्ट करून, विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे विवेचन करून या कामासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगितले .

याप्रसंगी आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या आकांक्षा व्यवहारे, तिचे पालक, मार्गदर्शक प्रवीण व्यवहारे, यांचा गौरव करण्यात आला. अनंता कुलकर्णी यांनी आपल्या सख्ख्या भावास आपली किडनी दान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. दहावी, बारावीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद गद्रे यांनी,  एस आर भागवत यांनी प्रास्ताविक, प्रकाश गाडगीळ यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सुनील नाईक यांनी आभार मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायली पेंडसे, गणेश व्यवहारे, आदींनी परिश्रम घेतले.   पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.