मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात येऊन साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सर्व महापुरुषांच्या नामाचा जयघोष करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे, हबीब शेख, अपर्णाताई देशमुख, अमोल गांगुर्डे, नितीन वाघमारे, राजू करकाळे, अक्षय देशमुख, श्रीराज कातकाडे, आनंद बोथरा, समाधान त्रिभुवन, विकास जाधव, प्रकाश गालफाडे, गणेश बोरसे आदि उपस्थित होते.

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद
मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...