नांदगाव : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून सौ.अंजुमताई कांदे यांच्या संकल्पनेतून नगर पालिकेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
आ. सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव व मनमाड शहरातील नगर पालिका शाळांना १० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सौ.अंजुमताई कांदे यांनी काही महिन्यांपूर्वी या शाळांचा पाहणी दौरा केला होता या दरम्यान शाळा इमारतींची दयनीय अवस्था पाहून आमदारांना सविस्तर परिस्थिती निदर्शनात आणून दिली होती. याच वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्याचा निर्धार केला होता.
याप्रसंगी व्यासपीठावर सौ.अंजुम कांदे, नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विवेक धांडे, प्रशासनाधिकारी सौ चंद्रा मोरे मॅडम, उज्वला खाडे, संगीता बागुल, विद्याताई जगताप, रोहिणी मोरे, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करत विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सौ अंजुमताई कांदे यांनी विद्यार्थ्यांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे . संबंधित शिक्षकांना त्यांनी आभार व्यक्त करण्यास मनाई केली, आपण सर्व एक कुटुंब आहोत आणि कुटुंबप्रमुख या नात्याने हे आमचे कर्तव्यच आहे. आज या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केली आहे यापुढे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच शिक्षकांनाही गणवेश उपलब्ध करून देण्याबाबत चा मानस त्यांनी व्यक्त करून दाखविला. सदर उपक्रम नांदगाव व मनमाड येथे याच दिवशी दरवर्षी घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. काही महिन्यांपूर्वी शाळेचा दौरा केला त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांकडे चांगला गणवेश तसेच वही पेन नसल्याचे निदर्शनास आले म्हणूनच आज सर्व विद्यार्थ्यांना वही वाटप करण्याचे मला सौभाग्य मिळाले असे त्यांनी यावेळी सांगितले.
या वेळी जवळपास ६२० विद्यार्थ्यांना जागेवरच वह्यांच्या सेट चे वाटप करण्यात आले.

मुख्याध्यापक साहेबराव घुगे सर, केदु जाधव सर, ईश्वर ठाकूर सर, शाहिद अख्तर लिपिक अनिल पाटील, यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, या वेळी नगरपालिका शाळांचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मोरे सरांनी केले.













