loader image
[ays_poll id=7]

1008 बेलाच्या पानांचा वापर करून साकारली महादेवाची प्रतिमा…

Aug 1, 2022

श्रावण सोमवार निमित्त 1008 बेलाच्या पानांचा वापर करून महादेवाची प्रतिमा येवल्यातील कलाकार संतोष राऊळ यांनी बेलाच्या पानांवर रंगांचा वापर करून साकारली असून महादेवाच्या मूर्तीच्या आजूबाजूला देखील बेलाचे पाने लावले असून या बेलांच्या पानावर देखील शिवशंभो ,महादेवाच्या विविध प्रतिमा,नावे देखील या कलाकाराने आपल्या हाताच्या साह्याने पेंट करून साकारली आहे.कलाकार आपली कलाकारी विविध माध्यमातून नेहमी साकारत असतो. अशाच प्रकारे येवल्यातील संतोष राऊळ या कलाकाराने श्रावण महिनाचे निमित्ताने 1008 बेलाचे पाने आणून ह्या सर्व बेलाच्या पानांना महादेवाचा आकार देऊन त्यावर कलर देऊन ध्यानस्थ महादेवाची अप्रतिम अशी प्रतिमा साकारली असून या मूर्तीच्या आजूबाजूला देखील शेकडो बेलाचे पाने लावून त्यावर देखील महादेवाच्या विविध प्रतिमा, ओम नमः शिवाय, डमरू, त्रिशूल असे सर्व महादेवाचे नावे व शस्त्र या कलाकाराने आपल्या हाताच्या साह्याने पानावर कलरच्या माध्यमातून  रेखाटन करून साकारले आहे. याकरता या कलाकाराला दोन दिवसाचा कालावधी लागला आहे.

अजून बातम्या वाचा..

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
.