loader image
[ays_poll id=7]

कपाशी पिकावर तणनाशक फवारऱ्या मुळे संपूर्ण कपाशी पिक नष्ट

Aug 2, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव तालूक्यातील कूसुमतेल येथील शेतकरी प्रकाश चव्हाण यांनी आपल्या कापूस पिकातील तणाच्या फवारणीसाठी यू .पी.एल कंपनीचे तणनाशक वापरल्यामुळेच संपूर्ण कपाशी पिक नष्ट झाले असा दावा सदर शेतकर्‍याने केला असून कंपनीकडून झालेल्या नुकसानीबाबत भरपाईची मागणी केली आहे.
तालुक्यातील घाटमाथा परिसरातील अनेक शेतकरी खरीप हंगामात कापूस या प्रमुख नगदी पिकांस प्राधान्य देतात.कूसूमतेल येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल चव्हाण यांनी शेतातील कापूस पिकातील तणासाठी यू.पी.एल या कंपनीचे स्वीप पावर हे तणनाशक वापरले असता अवघ्या काही तासातच दिड एकर कपाशी पिक संपूर्णतः नष्ट झाले. सदर नुकसानग्रस्त शेतकर्‍याच्या नूकसानीची पाहणी करण्यासाठी तालूका कृषी अधिकारी जगदीश पाटील,पंचायत समिती कृषी अधिकारी सुरेश चौधरी,शास्त्रज्ञ रुपेश खेडकर,प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी तसेच यू.पी.एल कंपणीचे प्रतिनिधी ऋषीकेश गाडवे आदी उपस्थित होते. पाहणी व अहवालाच्या आधारे सदर पिकाचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. कंपनी व उत्पादन विक्रेत्यांनी शेतकर्‍यांना फवारणी बाबत परिपूर्ण माहिती द्यावी असे आवाहन कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे.सदर शेतकर्‍याच्या झालेल्या अतोनात नुकसानीबद्दल तालूका प्रहार शेतकरी संघटनेने यू.पी.एल कंपनीचा निषेध व्यक्त केला तसेच शेतकर्‍यास नूकसान भरपाई न मिळाल्यास कंपनी विरोधात फसवणूकीचे गून्हे दाखल करण्याचा इशाराही प्रहारकडून देण्यात आला.

प्रतिक्रिया –

” कूसुमतेल येथील शेतकऱ्याने केलेल्या यूपीएल कंपणीच्या तणनाशक फवारणीमूळे शंभर टक्के नुकसान झाले असून सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन शास्त्रज्ञांच्या मदतीने नूकसानीबाबत अहवाल देण्यात आला आहे.सदर शेतकर्‍याने ग्राहकमंचात तक्रार दाखल केल्यास नुकसान भरपाई मिळू शकते.तालूक्यात कंपनी व दूकानदारांनी तणनाशक फवारणी करतांना उपयुक्त सूचना व माहिती शेतकर्‍यांना द्यावी.शेतकर्‍यांनी फवारणी करतांना सूचनापत्र लक्षात घेऊच फवारणी करावी.”
– जगदीश पाटील
तालूका कृषी अधिकारी, नांदगाव

“मी माझ्या शेतात कपाशी पिकातील तणासाठी यूपीएल कंपणीचे स्वीप पावर हे कपाशी पिकासाठीचे तणनाशक दिड एकर कपाशी क्षेत्रावर वापरले.या तणनाशकाच्या फवारणीमूळे माझे संपूर्ण पिक डोळ्यासमोर जळून गेले. होत्याचे नव्हते झाले.यूपीएल कंपनीने माझी फसवणूक केली असून मला नूकसान भरपाई द्यावी अन्यथा पूढे होणार्‍या परिणामांना कंपनी जबाबदार राहिल.”
– प्रकाश चव्हाण
नुकसानग्रस्त शेतकरी, कुसूमतेल

” यूपीएल कंपनीचे स्वीप पावर या तणनाशक वापरामुळे सदर शेतकऱ्यांचे कपाशी पीक पूर्णपणे जळाले असून या शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.नांदगाव तालूक्यातील शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की कृपया हे तणनाशक कूणीही वापरू नये.सदर शेतकर्‍यास आठ ते दहा दिवसांत यूपीएल कंपनीकडून नूकसान भरपाई न मिळाल्यास तालूक्यात यू.पी.एल कंपणीच्या उत्पादनांची होळी करण्यात येईल तसेच तालूक्यात या कंपणीच्या उत्पादनांची विक्री होऊ देणार नाही व या कंपनीवर फसवणूकीचे गून्हे दाखल करण्यात येईल”
– संदिप सुर्यवंशी
अध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना नांदगाव


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.