मनमाड – मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या 50 वर्षापासून मनमाड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना विविध विषयात लेखन, करण्याची गोडी लागावी म्हणून मनमाड शहरात या आंतरशालेय निबंध कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारची एकमेव स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाही हिच परंपरा कायम टिकवत वाचनालयातर्फे सोमवार दि.०१ ऑगस्ट २०२२ रोजी लोकमान्य सभागृह येथे आंतरशालेय कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही स्पर्धां तसेच मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे कोरोना काळात २०२० आयोजित स्पर्धा चा पारितोषिक वितरण व इयता १० वी १२ वी च्या परीक्षेत मनमाड केंद्रात पहिल्या तीन विद्यार्थी चा गुणगौरव समारंभाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मनमाड नगर परिषद चे मुख्यधिकारी सचिनकुमार पटेल मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा माजी अध्यक्ष प्रदीप गुजराथी संचालक नरेश गुजराथी, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट, सुरेश शिंदे कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक डॉ विलास थोरात व प्रा सौ. कविता काखंडकी , ॲड सुनील सरोदे,आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती, स्व.लोकमान्य टिळक, स्व.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी सोशल मीडिया च्याअत्यंत कठीण काळातही शालेय विद्यार्थ्यांना वक्तृत्व व लेखनाचे बळ मिळावे म्हणून सर्वांच्या सहकार्याने वाचनालय सातत्याने या स्पर्धा आयोजित करीत आहे असे सांगितले. मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या विविध उपक्रमा ची माहिती देत सचिव कल्पेश बेदमुथा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यांनी केले. संचालक नरेश गुजराथी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. तर परिक्षकांतर्फे डॉ विलास थोरात,सौ काखंडकी ॲड सुनिल सरोदे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. मनमाड सार्वजनिक वाचनालय अत्यंत सामाजिक जबाबदारीने अशा आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करुन भविष्या तील भावी सक्षम वक्ते निर्माण करण्याचे कौतुकास्पद कार्य करीत आहे असे आपल्या प्रमुख अतिथीय भाषणात सचिन कुमार पटेल यांनी सांगितले. मुख्यधिकारी सचिन कुमार पटेल यांच्या हस्ते खालील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुस्तक स्वरुपात बक्षिस वितरण करण्यात आले. , अक्षय सानप, मच्छिंद्र साळी अभिषेक पितृभक्त, सिध्देश परब ,प्रकाश धामणस्कर,यांनी स्पर्धेला केलेल्या विशेष सहकार्याबद्दल पटेल साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. आंतरशालेय निबंध स्पर्धेमध्ये 5 वी ते 7 वी छोटा गटा मध्ये प्रथम क्रमांक कु जिज्ञासा प्रविण मोरे (गुड शेफर्ड इंग्लिश स्कुल), द्वितीय क्रमांक कु.तनुश्री चंद्रकांत नाईक (के आर टी इंग्लिश स्कुल), तृतीय क्रमांक कु.खुशी नामदेव वाजे (के आर टी इंग्लिश स्कुल), प्रथम उत्तेजनार्थ कु.मिताली मनोज डोंगरे (गुरुगोविंदसिंग हायस्कूल ), द्वितीय उतेजनार्थ कु सिध्देश मंगेश वाणी (छत्रे न्यु इंग्लिश स्कुल), तृतीय उत्तेजनार्थ विभागून कु.श्रावणी ईश्वर खैरनार( के आर टी इंग्लिश स्कुल), तृतीय उत्तेजनार्थ विभागून कु.प्रणव सुहास जाधव (के.आर.टी.विद्यालय), , निबंध स्पर्धा इ.8वी ते 10वी मोठा गट प्रथम क्रमांक कु.देवयानी विद्याधर वाघ (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ), द्वितीय क्रमांक कु.विनय राजेश दराडे (छत्रे न्यू इंग्लीश स्कूल ), तृतीय क्रमांक कु मोहिनी संजय गवळी (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ), प्रथम उत्तेजनार्थ कु.कृष्णा गोरख शेळके (छत्रे न्यु इंग्लिश स्कुल), द्वितीय उत्तेजनार्थ विभागून कु.हर्षदा राघो कांबळे (संत झेवियर हायस्कूल ), द्वितीय उत्तेजनार्थ विभागून कु.आदित्य राजेश सोनवणे (के आर टी इंग्लिश स्कुल), तृतीय उत्तेजनार्थ विभागून कु.तनुजा संजय पगारे ( के आर टी विद्यालय ), तृतीय उत्तेजनार्थ विभागून कु.तंजिमा नदीम मिर्झा बेग (मरेमा विद्यालय) , कथाकथन स्पर्धा प्रथम क्रमांक कु.दिव्या अनिल कापडणे (छत्रे न्यु इंग्लिश स्कुल), द्वितीय क्रमांक कु.जान्हवी सुनील महाले (सरस्वती विद्यालय ), तृतीय क्रमांक कु.खुशी रामलाल चंदनशिव (संत बार्णाबा हायस्कूल ), प्रथम उत्तेजनार्थ कु.अर्णव मंदार ढोबळे (गुरूगोविदसिंग हायस्कूल ), द्वितीय उत्तेजनार्थ कु.वेदिका आनंद घुगे (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ), तृतीय उत्तेजनार्थ कु सिध्देश मंगेश वाणी (छत्रे न्यू इंग्लीश स्कूल ), वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक कु. तंजिमा नदीम मिर्झा बेग(मरेमा विद्यालय), द्वितीय क्रमांक कु जयश्री गोपीनाथ झालटे.(मरेमा विद्यालय), तृतीय क्रमांक कु. सई संतोष झालटे (के आर टी विद्यालय ), प्रथम उत्तेजनार्थ कु. देवयानी विद्याधर वाघ (छत्रे न्यू इंग्लीश स्कूल), द्वितीय उत्तेजनार्थ कु हर्षदा राघो कांबळे (संत झेवियर हायस्कूल), तृतीय उत्तेजनार्थ कु. मेहक जावेद खान पठाण (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल) या कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेमध्ये 14 विद्यालयातील सुमारे 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या बक्षिस वितरण समारंभास , दिनेश धारवाडकर , मरेमा विद्यालय च्या मुख्याध्यापिका सौ कुंझरकर सदाशिव सुतार संदीप देशपांडे ,हर्षद गद्रे, चेतन सुतार,हेमंत वाले के.आर.टी.विद्यालयाचे प्राचार्य मुकेश मिसर,संत बार्णाबा चे मुख्यध्यापक गरुड सर यांचे विशेष सहकार्य या उपक्रमास लाभले या कार्यक्रमास वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ.संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ.नंदिनी फुलभाटी, आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पालक, शिक्षक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. कार्यक्रम चे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे,सचिव कल्पेश बेदमुथा आणि संचालक मंडळ ने केले.













