loader image
[ays_poll id=7]

नांदगाव मध्ये गोवंश चोरीच्या घटनांमध्ये वाढ : कठोर कारवाईची नांदगावकरांची मागणी

Aug 5, 2022


गुरुवार ४ ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले की मागील काही दिवसात नांदगाव हद्दीतून गोवंश चोरीच्या घटना जास्त प्रमाणात घडत असतानाच परत एकदा 31 जुलै 2022 च्या रात्री 2:30ते 3:00 वाजेच्या दरम्यान माणिक संकुल व स्वामी विवेकानंद नगर येथून गायींची मोठ्या प्रमाणात चोरी झाली यासंदर्भात भा ज पा चे श्री सागर भाऊ फाटे, यांच्या नेतृत्वात व भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री दत्तराज जी छाजेड, तालुका अध्यक्ष श्री गणेश भाऊ शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री वाघ सर डॉ. देवरे सर, द्वारकानाथ कळंत्री, गोरक्षक समितीचे प्रदीप सिसोदिया, सक्रिय सामाजिक कार्यकर्ते भरत आप्पा मोकळ, यांच्या मार्गदर्शनात सदर निवेदन देण्यात पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना मोरया प्रतिष्ठानचे सौरभ वर्धेकर, राहुल भाऊ पैठणकर, सिद्धेश भावसार,अक्षय पवार, विकास शर्मा, परशुराम हरळे, गोपाल शर्मा, दर्शन शर्मा, कमलेश काळे, सुमित सोळशे, प्रसाद कुलकर्णी, योगेश पैठणकर, परेश सिसोदिया,व सकल हिंदू समाज नांदगाव चे सर्व सक्रिय सदस्य उपस्थित होते.


निवेदनद्वारे मा.पोलीस निरीक्षक साहेब यांना प्राणी क्रूरता अधिनियम1960 व गोवंश हत्या बंदी कायद्याच्याची अंमलबजावणी करुन लवकरात लवकर संबधितावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.