प्रत्येक संगीत प्रेमी च्या मनावर आपल्या मधुर आवाजाच्या अवीट गोडीचा ठसा उमटविणाऱ्या सुर सम्राट स्वर्गीय मो.रफ़ीनी 31 जुलाई 1980 रोजी आपल्या चाहत्यांना पोरके करत या जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या पुण्यतिथि निमित्त नेहमीप्रमाने ओर्केस्ट्रा ए. एम. झेड. मेलोडी स्टार तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते Ln. नावेद भाई शेख यांच्या पुढाकाराने सानप कॉम्प्लेक्स येथे पार पडला.कार्यक्रमाचे संयोजन गायक मुश्ताक शेख, इरफ़ान शेख, रब्बानी शेख (सर), आसिफ मन्सुरी यांनी केले.
या वेळी कार्यक्रमाला दर्दी रसिकांची उपस्थिति लक्ष लक्षणीय होती. कार्यक्रमास जेष्ठ कलाकार श्री. प्रेमनारायन कुशवाहा, नरेश येनारे, मंगेश कुलकर्णी, गुलाबराव भामरे, कोठावदे साहेब, गोरख लोनारी, मंगेश शहस्रबुद्धे, प्रा. विनोद आहिरे, सदानंद संसारे, आनंद शिंगारे, गांगुर्डे साहेब, फिरोज नारीमन, परवेज नारीमन, युनुस सय्यद, वाहीद्दिन तांबोळी, तसेच लासलगांव चे असिफ भाई मन्सुरी, अल्ताफ शेख उपस्थित होते.
वो जब याद आए बहोत याद आए, पत्थर के सनम, अजी क़ीबला मोहतरमा, कौन है जो सपनों मे आया, अशी अनेक रफ़ी सहेबांच्या अजरामर गीतानी रसीकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मन्सुरी यानी केले.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











