तीन दिवसापासुन शहर परीसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार आणि रिमझीम पावसामुळे शहरातील एकात्मता चौक परीसरात असलेल्या सार्वजनिक वाचनालया समोरील असलेल्या जुन्या इमारतीचा काही भाग काल दुपारी कोसळला.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अशी माहिती नगर परीषद प्रशासनाने दिली. मात्र भर बाजारपेठेत इमारत कोसळल्यानंतर बघणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.
गेल्या तीन दिवसापासुन बरसत असलेल्या मुसळधार आणि रिमझीम पावसाने जोर धरल्याने शहराती नदिनाले ओसंडून वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे रेल्वेचा महादेव बंधरा ओव्हरफ्लो झाला असून मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात जवळपास ३ फुट पाण्याची पातळी वाढली असून धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहे
मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
मनमाड - बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा...









