नांदगाव – नांदगाव येथील सौ.क.मा कासलीवाल माध्यमिक व प्राथमिक विद्यालय व जे.टी कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल येथे स्व माणिकचंदजी कासलीवाल यांचा 22 वा भावांजली समारोह संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास नांदगावचे माजी नगराध्यक्ष राजेशजी कवडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.
वडिलांच्या आशीर्वादानेच त्यांचा शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीचा वारसा समर्थपणे पुढे सुरू राहिल असे आश्वासन दिले. तसेच शाळेचा संपूर्ण स्टाफ हा माझा परिवारच आहे असा उल्लेख केला. वडिलांना उभी केलेली ही शैक्षणिक संस्था आज समर्थपणाने वाटचाल करीत आहे असे प्रतिपादन केले.
विद्यालयातील शिक्षक राहूल आहेर सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना
माणिकचंदजी कासलीवाल यांनी नि:स्वार्थी भावनेने सामाजिक कार्य केले. तसेच त्यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक ,व्यापार अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला.जीवनात ज्यांचा आदर्श घ्यावा, ज्यांच्या पाउलखुणा जपाव्यात असे थोर व्यक्तिमत्व नांदगावच्या भूमीला लाभले हे आपले भाग्यच आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.त्यांच्या धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याच्या आठवणी जाग्या केल्या.तसेच प्रशासकीय अधिकारी पी.पी.गुप्ता सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना हा कृतज्ञतांजली समारोह आहे असे वर्णन करून स्व.माणिकचंदजी कासलीवाल यांच्या गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. तसेच माणिकचंदजी कासलीवाल यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी नांदगावचे माजी नगराध्यक्ष राजेशजी कवडे,
संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा,
विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, सुशीलकुमार कासलीवाल ,
श्रीमती शोभाकाकीजी कासलीवाल, निर्मलाताई कासलीवाल
प्रशासन अधिकारी पी.पी गुप्ता , अंकुर कासलीवाल ,समीर कासलीवाल, अभिजित कासलीवाल,कमलेश कासलीवाल,
मुख्याध्यापक सर्वश्री गोरख डफाळ, विशाल सावंत, प्रिन्सिपल मनी चावला तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता गायकवाड यांनी तर सिद्धार्थ जगताप यांनी आभार व्यक्त केले.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











