मनमाड :- शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे निमित्ताने मनमाड बचाव कृती समितीने देश,समाज आणि जनता यांच्याप्रती राष्ट्रभान जागविण्याचा उद्देशाने शहरातून ७५ नागरिकांना ‘तिरंगा ध्वज ‘ बिल्ला लावून घराघरापर्यंत तो पोहचविण्याचा उपक्रम राबविला.
शहरातील एकात्मता चौकात बचाव समितीचे महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी ९ ऑगस्ट – क्रांतिदिनीं १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचा इतिहास उलगडला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या अमर शहिदांना अभिवादन करण्यात आले. शहरातील महत्वाच्या व प्रमुख रहदारीच्या एकात्मता चौकात कार्यकर्त्यांनी सुमारे ३ तास तिरंगा ध्वजाचे बिल्ले नागरिकांच्या छातीवर लावले. नागरिकही उत्सुर्तपणे प्रतिसाद देत स्वतःहून बिल्ले लावून घेण्यासाठी पुढे येत होते.
समितीचे अध्यक्ष पुंडलिक कचरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुषमा तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्त्री-पुरुष, युवा-युवती आणि विविध स्तरातील नागरिकांचा दांडगा उत्साह कार्यकर्त्यांना नवा जोश देऊन गेला.
उपक्रमात रमेश खरे,सुरेश वाघ,आर.बी. ढेंगळे,रमेश चारुडे,बी.टी. पदमने, चंद्रकांत जाधव,राम महाले, मोतीराम भालेराव,अर्जुन साळवे,रश्मी मोरे,शमशाद सय्यद,सुनीता महाले,सीमा वानखेडे,राणी थोरात, यशवंत बागुल,अशोक परदेशी व इतरांनी सहभाग दिला.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











